| अ.क्र. | नियम |
|---|---|
| 1 | सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होणे अनिवार्य राहील. |
| 2 | या अभियानात सहभागी होण्यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत विशेष ग्राम सभा घेऊन प्रत्येक ग्रामस्थाला विशेषतः महिलांना या अभियानाबाबत संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असेल. |
| 3 | आदर्शवती पुरस्कारासाठी एकाच ग्रामपंचायतीची निवड करण्यात येईल. जर एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींना समान गुण प्राप्त झाले असतील तर पुरस्कारासाठी असलेल्या चार विषयात (बालविवाह मुक्त, स्त्री हिंसाचार मुक्त, मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण व कुपोषण मुक्त) ज्या ग्रामपंचायतीला जास्त गुण असतील त्या ग्रामपंचायतीची पुरस्काराकरिता निवड करण्यात येईल. |
| 4 | तपासणी समितीच्या प्रत्येक सदस्याने आपल्यावरील जबाबदारीची जाणीव ठेवून ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची तपासणी व मूल्यांकन निष्पक्षपणे करावे. |
| 5 | अभियानांतर्गत प्रत्येक स्तरावर दिलेला निर्णय अंतिम असेल, त्याविरुद्ध कोणत्याही स्तरावर अपील करता येणार नाही. |
| 6 | पुरस्कार प्राप्त ठरलेल्या ग्रामपंचायती पुढील वर्षी पुन्हा स्पर्धेत भाग घेऊ शकतील. परंतु त्यांना पुढील पाच वर्षे अभियानांतर्गत कोणत्याही स्तरावर पुरस्कार देय राहणार नाही. परंतु, अशा ग्रामपंचायतींना विशेष प्रमाणपत्र देण्यात येईल. |
| 7 | तपासणी समितीमध्ये तपासणी दरम्यान दोन तृतीयांश सदस्य तपासणी करण्याकरिता पूर्ण वेळ हजर असणे आवश्यक असेल. |