मा. मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
मा. उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
मा. उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
मंत्री, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
राज्यमंत्री, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
सचिव, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
आयुक्त, महिला व बालविकास विभाग,महाराष्ट्र राज्य
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र हे राज्यातील गरजू नागरिकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबविणारे पुरोगामी राज्य आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६०% महिला व बालके आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये महिलाभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व महिलाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलांपर्यंत पोहोचविणे हा प्रमुख उद्देश ठेवून तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणे व जनजागृतीच्या माध्यमातून चळवळ निर्माण करणे, अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे तसेच महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याच्या हेतूने विशेष अभियान राबविण्याची व आदिशक्ती अभियान उत्कृष्ठपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या, ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सन 2025-26 पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
१) ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्त्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निराकरण करणे.
२) कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता सक्षम समाज निर्माण करणे.
३) लिंगभेदात्मक विचारसरणीला आळा घालून किशोरींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे व बालविवाह मुक्त समाज निर्माण करणे.
४) लैंगिक, शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे व अनिष्ट रूढी निर्मूलन करणे.
५) महिला नेतृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे.
६) महिला, किशोरी यांना शिक्षण, रोजगार, निर्णय व हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधींच्या माध्यमातून आर्थिक उन्नत स्त्री संकल्पना राबविणे.
महिला व बालविकास आयुक्तालय २८,
राणीचा बाग ,
VVIP गेस्ट हाऊस बाजूला,
पुणे - १.